ट्रॉजन डिमेलो गोवा फॉरवर्डमध्ये

0
89

प्रदेश कॉंग्रेसचे माजी प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल गोवा फारवर्ड पक्षात रितसर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष तथा मंत्री विजय सरदेसाई, जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर, मोहनदास लोलयेकर, तन्वीर खतिब व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
डिमेलो हा गोयकारपणाचा बुलंद आवाज आहे. पक्ष बळकट करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल, असे सरदेसाई यांनी सांगितले. निवडणुकीच्या पूर्वी ट्रॉजन सत्याच्या बाजूने राहिले होते. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांच्यावर कारवाई केल्याचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले. सर्वधर्मसमभाव व गोयकारपणाच्या प्रश्‍नावर सरदेसाई तडजोड करणारे नेते नाहीत. त्यामुळेच आपण त्यांच्या पक्षात प्रवेश केल्याचे डिमेलो यांनी सांगितले.