ट्रक दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू

0
1

कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील येल्लापुरा येथे बुधवारी पहाटे एक ट्रक खोल दरीत कोसळला. त्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. तसेच 15 जण गंभीर जखमी झाले. सावनूर येथून फळे आणि भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये 25 हून अधिक जण प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.