टूरिस्ट टॅक्सी चालकांना बॅच सक्ती

0
151

>> राज्य सरकारकडून परिपत्रक जारी

वाहतूक खात्याने राज्यात पर्यटक टॅक्सी चालकांसाठी बॅच सक्तीचा करणारे परिपत्रक काल जारी केले. सार्वजनिक सेवा देणारे वाहन चालविणार्‍या चालकांसाठी वाहन चालविण्याच्या परवान्याबरोबरच वाहतूक विभागाचा बॅच सक्तीचा करण्यात आला आहे. गोवा वाहन कायदा नियम १९९१ अंतर्गत बॅच सक्तीचा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये दिलेल्या एका निवाड्यानुसार वैयक्तिक हलके मोटर वाहन चालविण्याचा परवाना असलेली व्यक्ती व्यावसायिक परवान्याशिवाय टॅक्सी किंवा हलके वाहन चालवू शकतो. राज्य सरकारने कायदा विभागाची मान्यता घेऊन बॅच सक्ती करणारे परिपत्रक जारी केले आहे.

राज्यात गोवा माईल्स ही ऍप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्यात आल्यानंतर स्थानिक टूरिस्ट टॅक्सी मालक आणि चालकांनी परराज्यातील वाहन चालकांची संख्या वाढेल, असा आरोप केला होता. राज्यात पर्यटक आणि नागरिकांसाठी चांगली आणि सुरक्षित टॅक्सी सेवा उपलब्ध करण्यासाठी टॅक्सी चालकांसाठी बॅच सक्तीचा करणारा निर्णय घेण्यात आला आहे.
टॅक्सी चालविण्यासाठी बॅचसाठी अर्ज करणार्‍याला पंधरा वर्षांचा रहिवासी दाखला आणि पोलिसांकडून वर्तवणूक दाखला सादर करावा लागणार आहे.