टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी मात

0
113

>> धवन, कोहली, राहुलची अर्धशतके; मालिकेत १-१ बरोबरी

लोकेश राहुल, कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकानंतर मोहम्मद शमीसह गोलंदाजांच्या सूत्रबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने दुसर्‍या वनडेत ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव करीत ३ लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

भारताकडून मिळालेल्या ३४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सर्व गड्यांच्या मोबदल्यात ३०४ धावांपर्यंत मजल मारता आली. स्टीव्ह स्मिथने एकतर्फी झुंज देताना १०२ चेंडूत ९ चौकार व १ षट्‌कारासह ९८ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याचे शतक केवळ २ धावांनी हुकले. मार्नस लाबुशेनने ४७, ऍरन फिन्चने ३३, केन रिचर्डसनने २४ तर ऍश्टन एगरने २५ धावांची खेळी करीत विजयासाठी जोरदार प्रयत्न केला. परंतु भारतीय गोलंदाजांनी सूत्रबद्ध मारा करीत त्यांचे मनसुबे उधळून लावले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ तर जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने ६ गडी गमावत ३४० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. रोहित (४२) ऍडम झम्पाचा बळी ठरला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या कर्णधार कोहलीने धवनच्या साथीत दुसर्‍या विकेटसाठी १०३ धावा जोडल्या. धवनचे शतक केवळ ४ धावांनी हुकले. १३ चौकार व १ षट्‌कारासह ९६ धावा करून तो तंबूत परतला. श्रेयस अय्यर ७ धावा करून बाद झाला. तर कर्णधार कोहलीने ७८, लोकेश राहुलने ८० व रविंद्र जडेजाने नाबाद २० धावांची खेळी करीत ऑस्ट्रेलियासमोर ३४१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने ३ तर केन रिचर्डसनने २ गडी बाद केले.

धावफलक,
भारत ः रोहित शर्मा पायचित गो. ऍडम झम्पा ४२, शिखर धवन झे. मिचेल स्टार्क गो. केन रिचर्डसन ९६, विराट कोहली झे. मिचेल स्टार्क गो. ऍडम झम्पा ७८, श्रेयस अय्यर त्रिफळाचित गो. ऍडम झम्पा ७, लोकेश राहुल धावचित (आलेक्स कॅरी) ८०, मनीष पांडे झे. ऍशटन एगर गो. केन रिचर्डसन २, रविंद्र जडेजा नाबाद २०, मोहम्मद शमी नाबाद १.
अवांतर ः १४. एकूण ५० षट्‌कांत ६ बाद ३४० धावा.
गोलंदाजी ः पॅट कमिन्स १०/१/५३/०, मशेल स्टार्क १०/०/७८/०, केन रिचर्डसन १०/०/७३/२, ऍडम झम्पा १०/०/५०/३, ऍश्टन एगर ८/०/६३/०, मार्नस लाबुशेन २/०/१४/०.
ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर झे. मनिष पांंडे गो. मोहम्मद शमी १५, ऍरॉन फिन्च यष्टिचित लोकेश राहुल गो. रविंद्र जडेजा ३३, स्टीव्ह स्मिथ त्रिफळाचित गो. कुलदीप यादव ९८, मार्नस लाबुशेन झे. मोहम्मद शमी गो. रविंद्र जडेजा ४६, ऍलेक्स कॅरी झे. विराट कोहली गो. कुलदीप यादव १८, ऍश्टन टर्नर त्रिफळाचित गो. मोहम्मद शमी १३, ऍश्टन एगर पायचित गो. नवदीप सैनी २५, पॅट कमिन्स पॅट कमिन्स त्रिफळाचित गो. मोहम्मद शमी ०, मिशेल स्टार्क झे. लोकेश राहुल गो. नवदीप सैनी ६, केन रिचर्डसन नाबाद २४, ऍडम झम्पा झे. लोकेश राहुल गो. जसप्रीत बुमराह ६.
अवांतर ः २०. एकूण ४९.१ षट्‌कांत सर्वबाद ३०४ धावा.
गोलंदाजी ः जसप्रीत बुमराह ९.१/२/३२/१, मोहम्मद शमी १०/०/७७/३, नवदीप सैनी १०/०/६२/२, रविंद्र जडेजा १०/०/५८/२, कुलदीप यादव १०/०/६५/२.