उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबरला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, सर्वात मोठा प्रश्न होता की टाटा ट्रस्टच्या ज्या पदावर रतन टाटा 1991 पासून कार्यरत होते, त्या पदावर कोण बसणार? रतन टाटांच्या विचारांशी बांधिलकी असणारा उत्तराधिकारी कोण असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारानंतर 24 तासांच्या आतच त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला आहे. रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
काल सकाळी 11 वाजता टाटा ट्रस्ट बोर्डाची बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक कफ परेड, मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवरच्या 26 व्या मजल्यावर असलेल्या टाटा कार्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीला टाटा ट्रस्ट बोर्डाचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम दिवंगत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.