>> येत्या शैक्षणिक वर्षापासून आयटीआयमध्ये सुरू करणार अभ्यासक्रम
टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडकडून राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) 6 दीर्घ मुदतीचे आणि 23 अल्प मुदतीचे अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकता खात्याचे संचालक एस. एस. गावकर यांनी दिली.
कौशल्य विकास योजनेअंतर्गत टाटा टेक्नॉलॉजी या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यात टाटा टेक्नॉलॉजीजकडून अंदाजे 160 कोटी रूपये खर्चून पाच आयटीआयमध्ये साधनसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच, दीर्घ व अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
तीन महिन्यांचे अभ्यासक्रम
तीन महिन्यांच्या अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमामध्ये इनोव्हेशन आणि डिझाइन थिंकिंग, उत्पादन डिझाइनची मूलभूत तत्त्वे, प्रक्रिया नियंत्रण आणि ऑटोमेशन, ऑटो इलेक्ट्रिकल डिझाइन आणि विकास, उत्पादन सत्यापन आणि विश्लेषण, ऑटो इलेक्ट्रिकल देखभाल, उत्पादन डिझाइन आणि विकास, संगणक साहाय्यित मशीनिंग, प्रगत संगणक सहाय्यित मशीनिंग, प्रगत ऑटोमोबाईल अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल देखभाल, दुरुस्ती आणि इलेक्ट्रिक वाहनाची दुरुस्ती, इंटरनेट ऑफ थिंग्स, प्रगत मशीनिंग, प्रगत मशीनिंग, प्रगत ऍडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, प्रगत वेल्डिंग, ऑटोमोबाईल अभियांत्रिकीची मूलभूत तत्त्वे, प्रगत चित्रकला तंत्रज्ञान, औद्योगिक रोबोटिक्स-1, औद्योगिक रोबोटिक्स-2, प्रगत प्लंबिंग आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचा लाभ आयटीआय अंतिम वर्ष, आयटीआय पदवीधर कार्यरत व्यावसायिक घेऊ शकतात.
दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम
दीर्घ मुदतीच्या अभ्यासक्रमामध्ये उत्पादन प्रक्रिया नियंत्रण आणि ऑटोमेशन, औद्योगिक रोबोटिक्स आणि डिजिटल उत्पादन, प्रगत साधने वापरणारे कारागीर, बॅटरी इलेक्ट्रिक वाहन, डिझाइन आणि आभासी पडताळणीची मूलभूत माहिती आणि प्रगत उत्पादन यांचा समावेश आहे. दहावीची परीक्षा गणित आणि विज्ञानासह उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.