‘झुआरी ॲग्रो’च्या कारखान्यात अमोनिया गळती

0
26

झुआरीनगर-सांकवाळ, बिर्ला येथील झुआरी ॲग्रो कॅमिकल कंपनीच्या कारखान्यात टाकीतून अमोनिया वायू (गॅस) दुसऱ्या टाकीत वाहिनीद्वारे घालताना काल गळती झाली. गळती लागून 40 मिनिटे अमोनिया वायू हवेत पसरला. यानंतर झुआरी ॲग्रो कंपनीच्या आग नियंत्रण विभागाने वायूवर नियंत्रण आणण्यास यश प्राप्त केले. अमोनिया वायू हवेत पसरल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

सांकवाळ, बिर्ला येथील झुआरी ॲग्रो कॅमिकल कंपनीच्या अमोनिया प्लांटमध्ये मंगळवारी सकाळी 8.30 वाजता ही घटना घडली.
टाकीतून वाहिनीद्वारे अमोनिया वायू दुसऱ्या टाकीत घालताना गती वाढल्याने व्हॉल्व सुटून अमोनियाची गळती सुरू झाली. या घटनेनंतर कंपनीच्या 400 कामगारांना त्या ठिकाण्याहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले. अमोनिया वायूवर अखेर 40 मिनिटांनी कंपनीला नियंत्रण मिळविण्यात यश आले. वेर्णा पोलिसांनी वायू गळतीच्या या घटनेला दुजोरा दिला.