झारखंड विधानसभेच्या २० मतदारसंघांसाठी आज मतदान होणार आहे. ८१ सदस्यीय झारखंड विधानसभा निवडणुकीचा आजचा दुसरा टप्पा आहे. माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा व मधू कोडा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माओवाद्यांचा वावर असलेल्या सात जिल्ह्यांमध्ये हे मतदान होणार असल्याने सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आज मतदान होणार्या २० पैकी १६ मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव आहेत. २० मतदारसंघांमधून २१ लाख ७२ हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत.