झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते रघुवर दास यांनी काल येथे आयोजित समारंभात शपथ घेतली. दास हे झारखंडचे बिगर आदिवासी पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियमवरील या समारंभात राज्यपाल सय्यद अहमद यांनी दास यांना शपथ दिली. यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून नीलकंठ सिंग मुंडा, चंद्रेश्वर प्रसाद सिंग, लुईस मरांडी (भाजप) व चंद्रप्रकाश चौधरी (झारखंड स्टुडंटस् युनियन) यांनीही शपथ घेतली. झारखंड मंत्रिमंडळासाठी मुख्यमंत्र्यांसह १२ मंत्र्यांची मर्यादा आहे. दिल्लीत खराब हवामानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा या समारंभास येऊ शकले नाही.