सारे आयुष्य संशोधन व लेखनासाठी वाहिलेले ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात इतिहास संशोधक आणि प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे काल निधन झाले. दीर्घ आजारानंतर पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने नव्या पिढीला इतिहासाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळल्याची भावना साहित्यिक वर्तुळात व्यक्त होत आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.