ज्येष्ठ पत्रकार सिरिल डिकुन्हा (91 वर्षे) यांचे काल निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार गुरुवार 14 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 3 वाजता पर्वरी येथे करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार सिरिल कुन्हा यांनी अनेक वर्तमानपत्रातून काम केले आहे. त्यांच्या पत्रकारितेतील कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने वर्ष 2022 मध्ये पत्रकारितेतील टी. बी. कुन्हा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. गोवा श्रमिक पत्रकार संघटना, गोवा फुटबॉल असोसिएशन, गोवा हौशी ऍथलेटिक असोसिएशन, क्रीडा पत्रकार संघटनेचे संस्थापक सदस्य होत. सिरिल डिकुन्हा यांचे पार्थिव गुरूवारी दुपारी 1 वाजता शवागारातून पर्वरी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 3 वाजता पर्वरी येथील चर्चमध्ये प्रार्थना सभा होणार आहे, असे कळविण्यात आले आहे.