ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सिंगबाळ यांचे निधन

0
16

इंग्रजी पत्रकारितेत आपला एक वेगळा ठसा उमटविलेले ज्येष्ठ गोमंतकीय पत्रकार गुरुदास सिंगबाळ यांचे काल अल्प आजाराने पर्वरी येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. सांतिनेझ-पणजी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

१९६३ साली सिंगबाळ यांनी ‘नवहिंद टाइम्स’मधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर ‘वेस्ट कोस्ट टाइम्स’ आणि नंतर ‘इंडियन एक्सप्रेस’चे गोवा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या पश्‍चात पुत्र, सून, कन्या व नातवंडे असा परिवार आहे. त्यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.