ज्येष्ठ कोकणी साहित्यिक डॉ. तानाजी हळर्णकर निवर्तले

0
278

ज्येष्ठ कोकणी साहित्यिक डॉ. तानाजी हळर्णकर (७७) यांचे काल निधन झाले. त्यांनी गोवा कोकणी अकादमी, कोकणी भाषा मंडळ, अखिल भारतीय कोकणी परिषद, केंद्रीय साहित्य अकादमीच्या कोकणी सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. गोवा विद्यापीठाच्या कोकणी विश्वकोषाच्या चार खंडांच्या संपादनाचे कार्य डॉ. हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी डॉ. हळर्णकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. हळर्णकर यांचे कोकणी साहित्यामध्ये मोठे योगदान आहे, असे कामत यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
तानाजी हळर्णकर हे अजातशत्रू होते. डॉ. हळर्णकर यांच्या निधनाने कोकणी भाषा आणि चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत डॉ. भूषण भावे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. कोकणी भाषा मंडळानेही डॉ. हळर्णकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.