आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी काल बुधवारी दि. 19 रोजी देशाचे 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. नवीन कायद्यांतर्गत नियुक्त झालेले ते पहिले सीईसी आहेत. त्यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत राहील. यापूर्वी, मुख्य निवडणूक आयुक्तपद भूषवणारे राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले.
ज्ञानेश कुमार यांच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात 20 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशमध्ये (पुदुच्चेरी) निवडणुका होतील.
ज्ञानेश कुमार यांच्याव्यतिरिक्त विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते हरियाणाचे मुख्य सचिव आणि 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 17 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत या नियुक्त्यांना मान्यता देण्यात आली. गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील बैठकीला उपस्थित होते.