जनता दल (सेक्युलर) अर्थात जेडीएसचे सर्वेसर्वा आणि भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युतीचा निर्णय घेतला आहे. गेले अनेक दिवस तळ्यात-मळ्यात सुरू असताना देवेगौडांनी भाजप आणि जेडीएस एकत्र निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्ताला काल दुजोरा दिला.
एचडी देवेगौडा यांनी बंगळुरूतील एका कार्यक्रमात काल सांगितले की, भाजप आणि जेडीएस एकत्र लोकसभा निवडणूक लढतील. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र निवडणुका लढवण्याचे मान्य केले आहे. जेडीएस किती जागा लढवणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चेनंतर ठरवले जाईल.देवेगौडा यांनी आपल्या प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.