जेएन.1 मुळे तीन रुग्णांचा मृत्यू

0
5

कोरोनाचा नवा उपप्रकार जेएन.1 ने चिंतेत भर पाडली आहे. देशात या उपप्रकाराच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी एकट्या कर्नाटकात 34 जेएन.1 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली, तर, तिघांचा मृत्यू झाला. दुसरीकडे केरळमध्येही कोरोनाचा उद्रेक झाला आहे. एकाच दिवसात कोरोनाचे 115 नवीन बाधित आढळले आहेत.

कर्नाटकच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जेएन.1 व्हेरिएंटची एकूण 34 प्रकरणे आढळून आली आहेत. यापैकी 20 प्रकरणे बंगळुरूमध्ये, म्हैसूरमध्ये चार प्रकरणे, मंड्यामध्ये तीन प्रकरणे आणि रामनगरा, बंगळुरू ग्रामीण, कोडागु आणि चामराजा नगारा येथे प्रत्येकी एक कोरोनाबाधित नोंदवण्यात आला आहे. नवीन जेएन.1 व्हेरिएंटबाधित तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशभरात 24 तासांत नवे 628 रुग्ण सापडले आहेत.