जून 2025 पर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण होणे अशक्य

0
7

अयोध्येतील राम मंदिर निर्माण समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. राम मंदिराचे संपूर्ण बांधकाम जून 2025 पर्यंत नाही, तर सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल, असे बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बैठकीनंतर सांगितले. परकोटाच्या बांधकामात सुमारे एक किलोमीटरचा घेर आहे. त्यात 6 मंदिरे बांधली जाणार आहेत. यापैकी सुमारे 8.50 लाख घनफूट बनशी पहारपूर दगडाची गरज आहे. दगडही आले आहेत; परंतु 200 कामगारांच्या कमतरतेमुळे बांधकामाला विलंब होत आहे, असे मिश्रा म्हणाले. दरम्यन, राम मंदिराच्या पूर्ण बांधकामाची वेळ जून-2025 निश्चित करण्यात आली होती.