>> जुने गोवे पंचायतीकडून अखेर ठराव मंजूर
जुने गोवे ग्रामपंचायतीने वारसा स्थळ परिसरातील बेकायदा बांधकाम पाडण्याचा ठराव संमत केला आहे. संबंधित मालकाला बांधकाम जमीनदोस्त करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मालकाने बेकायदा बांधकाम जमीनदोस्त न केल्यास उपजिल्हाधिकार्यांच्या मार्फत ते पाडले जाणार आहे.
जुने गोवे येथील वारसा स्थळातील बेकायदा बांधकामाचा विषय स्थानिक नागरिकांनी केलेल्या उपोषण आणि आंदोलनामुळे बराच गाजला. त्यानंतर नगरनियोजन विभागाने सदर बांधकामाला दिलेली तांत्रिक मान्यता मागे घेऊन पंचायतीला कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानंतर जुने गोवे पंचायत मंडळाने वारसा स्थळातील बेकायदा बांधकामाची पाहणी केली होती. त्यानंतर आता पंचायत मंडळाच्या बैठकीत बेकायदा बांधकाम विषयावर चर्चा करून ते पाडण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे.