जुना, नवा मांडवी पूलशनिवारी बंद राहणार

0
12

शनिवार दि. 9 डिसेंबर रोजी मांडवी नदीवरील जुना व नवा पूल सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या पुलांच्या देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर दिवशी सकाळी 6 ते 9 असे तीन तास हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या दोन्ही पुलांच्या ‘डेक लेव्हल्स’ची तपासणी करायची आहे, त्यासाठी हे दोन्ही पूल तीन तास बंद ठेवावे लागतील, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने आपल्या आदेशात म्हटले आहे. जुना मांडवी पूल बंद केल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून हलकी वाहने नव्या मांडवी पुलावरून दोन्ही बाजूंनी सोडण्यात येतील, तर अवजड वाहने अटल सेतूवरून सोडण्यात येतील. तसेच नवा मांडवी पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर अवजड वाहने अटल सेतूवरून (दोन्ही बाजूंनी) सोडण्यात येतील, तर हलकी वाहने जुन्या मांडवी पुलावरून दोन्ही बाजूंनी सोडण्यात येतील.