जुगार प्रकरणी 7 जण अटकेत

0
20

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने म्हापसा नगरपालिका उद्यानाजवळील एका ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा टाकून 7 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 3.93 लाखांची रोकड मिळून 4.35 लाख रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य जप्त केले. म्हापसा नगरपालिकेच्या उद्यानाजवळ असलेल्या एका दुकानात जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा विभागाच्या पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी 6.20 ते 7.10 दरम्यान छापा घातला. त्या ठिकाणी खेलो जीतो गेम्स नामक ऑनलाइन जुगार सुरू असल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने जुगार खेळणाऱ्या 7 जणांना ताब्यात घेतले. त्यावेळी पथकाने 3.93 लाखांच्या रोख रकमेसह दोन लॅपटॉप मिळून 4.35 लाख रुपये किमतीचे जुगार साहित्य जप्त केले.