जुगारावर छापा; 23 जणांना अटक

0
5

पणजी पोलिसांनी येथील महानगरपालिकेच्या मार्केटमधील एका जुगार अड्ड्यावर काल छापा घालून 23 जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 1.26 लाख रुपयांची रोकड व इतर सामान जप्त केले. पणजी मार्केटमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या जुगार अड्ड्यावर ‘रमी’ जुगार खेळला जात होता. या छाप्यात 1 लाख 26 हजार 630 रुपये, जुगाराचे साहित्य जप्त केले.