जी-२० शिखर परिषदेच्या ८ बैठका गोव्यात होणार

0
11

पर्यटन, आरोग्य, शाश्वतता उद्दिष्टे यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवरील जी २० शिखर परिषदेच्या २०० पैकी ८ बैठका गोव्यात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. जी-२० शिखर बैठक भारतात होणार आहे, त्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि अधिकार्‍यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आभासी पध्दतीने आयोजित बैठकीत सहभाग घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या परिषदेमुळे गोव्याच्या पर्यटनाला मोठा फायदा होईल. या परिषदेदरम्यान स्थानिक हस्तकला, पाककृती, संस्कृती इत्यादींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. जी-२० शिखर परिषदेचा पहिला कार्यक्रम एप्रिल २०२३ मध्ये गोव्यात होणार आहे. बहुतांश बैठका ताज कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. जी-२० हा जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक आणि विकसनशील राष्ट्रांचा एक आंतरराष्ट्रीय गट आहे.