जीसीए पदाधिकार्‍यांविरुद्ध गैरव्यवहाराची तक्रार

0
95

गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद फडके व खजिनदार अकबर मुल्ला यांनी संगनमताने गोवा क्रिकेट असोसिएशनला ३.१३ कोटींना गंडा घातल्याची लेखी तक्रार जीसीएचे आजीव सदस्य विलास देसाई यांनी गुन्हा अन्वेषण विभागाकडे नोंदवली आहे.

गोवा क्रिकेट असोसिएशनची बनावट कागदपत्रे व ठराव यांचा वापर करून डेव्हलपमेंट क्रेडीट बँकेच्या पणजी शाखेत जीसीएच्या नावे खाते उघडले व बीसीसीआयने दिलेल्या टीव्ही अनुदानात गैरव्यवहार करून जीसीएचे २.८७ कोटींचे नुकसान केले असे तक्रारीत म्हटले आहे. फेडरल बँकेतून २६ लाख रुपये हाको एंटरप्राइझेसला देण्याच्या बहाण्याने काढण्यात आले असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी भा. दं. सं. क्र. ४०८, ४०९, ४१९ आदींखाली गुन्हा नोंदविला आहे.