सर्वोच्च न्यायालयाने मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना जमीन बळकाव प्रकरणामध्ये दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात जमीन हडप आणि फसवणूक प्रकरणामध्ये दाखल केलेला गुन्हा रद्दबातल केला आहे. त्यांच्या विरोधात पेडणे पोलीस स्थानकात जमीन बळकाव व फसवणूक प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता. आरोलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करून आपल्या विरोधातील सदर गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. तथापि, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.