गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून (जीटीडीसी) आर्थिक वर्ष 2021-22 च्या लाभांशांचा 45 लाख 29 हजार 382 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे काल सुपूर्द करण्यात आला. जीटीडीसीचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी हा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे पर्यटनमंत्री रोहन खंवटे व इतरांच्या उपस्थितीत सुपूर्द केला.