जीएसटी मंत्रिगटात प्रमोद सावंत यांची वर्णी

0
9

केंद्र सरकारने आरोग्यविमा व आयुर्विमा यासंबंधी स्थापन केलेल्या 13 सदस्यीय जीएसटी मंत्रिगटात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सदस्य म्हणून निवड केली आहे. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या 54 व्या जीएसटी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत आरोग्यविमा व आयुर्विमा या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सदर मंत्रिगट हा आरोग्य व आयुर्विमा याची यशस्वी अंमलबजावणी, त्यावरील जीएसटी प्रीमियम व त्यावरील कराच्या टक्केवारीचे पुनरावलोकन करणे यावर काम करून त्याचा अहवाल 30 ऑक्टोबरपर्यंत केंद्र सरकारला सादर करणार आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे समन्वयक असतील.