जीएसटी मंडळावर कायमस्वरूपी सदस्यपदी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी जीएसटी मंडळावर गोव्याचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून मंत्री माविन गुदिन्हो यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता, गुदिन्हो यांना जीएसटी मंडळावरून हटविण्यात आले आहे. यापुढे मंडळाच्या सर्व बैठकांना मुख्यमंत्री डॉ. सावंत उपस्थित राहणार आहेत.