जीएसटी, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेची घसरण

0
95

>> पॉंडेचरीच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

देशाच्या अर्थव्यवस्थेची जीएसटी आणि नोटाबंदीमुळे घसरण सुरू आहे, असा आरोप पॉंडेचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी येथे काल केला.
येथे आयोजित जीएसटी मंडळाच्या ३७ व्या बैठकीसाठी पॉंडीचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी आले आहेत. मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी कॉंग्रेस भवनाला भेट देऊन प्रदेश कॉंग्रेस समितीचे पदाधिकारी, गट अध्यक्ष आणि युवा कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची उपस्थिती होती.
देशात अर्थव्यवस्थेची घसरण सुरू असल्याने नवीन उद्योगधंदे सुरू होत नाहीत. त्यामुळे बेकारीची समस्या वाढत चालली आहे, असा दावा मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी केला.

जनता भाजपच्या विरोधात आहेत. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करून भाजपला धडा शिकविण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील रस्त्यांची स्थिती चांगला नाही. तरी भाजप सरकारने जीएसटी बैठकीचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला. भाजपच्या चुकीच्या आर्थिक नीतीमुळे देशाची अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.