जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत ‘इंडिया’चे जोझेफ पिमेंता विजयी

0
7

>> बाणावलीत आम आदमीचे वर्चस्व

बाणावली जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडी व आपचे उमेदवार जोझेफ पिमेंता 3049 मतांनी विजयी झाले. आम आदमी पक्षाने या ठिकाणी आपले वर्चस्व कायम राखले. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आम आदमी व इंडिया आघाडीसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती.इतर तिघांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार इंडिया आघाडीचे जोझफ पिमेंता यांना 5672 मते, ग्रेफन्स फर्नांडिस यांना 2623, रॉयेला फर्नांडिस यांना 1840 तर फ्रेक फर्नांडिस यांना 276 मते मिळाली.

पोटनिवडणुकीत 20129 मतदारांपैकी 10499 मतदारांनी मतदान केले. त्यात 4531 पुरूष तर 5961 महिलांनी मतदान केले. या अगोदर याच मतदारसंघातून आपचे हेजल फर्नांडिस निवडून आले होते. आता यावेळीही पुन्हा आपचेच जोझेफ पिमेंता निवडून आले आहेत.