जिल्हा पंचायतींच्या डिजिटल मतदार याद्या कॉंग्रेसला द्याव्यात

0
112

>> चोडणकरांचे निवडणूक आयोगाला साकडे : बीएलओंकडून मतदार स्लिप्सही नाहीत

जिल्हा पंचायत निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अजूनही कॉंग्रेस पक्षाला मतदारांच्या डिजिटल याद्या देण्यात आलेल्या नसून पक्षाने याबाबत ११ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून त्याची कल्पना दिलेली आहे. आयोगाने पक्षाला आता डिजिटल प्रती पुरवण्याची सोय करावी, अशी मागणी केली असल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा पंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या दहा दिवस अगोदरच भाजपकडे या छापील मतदार याद्या होत्या. भाजपने आपल्या पणजी कार्यालयात त्या दडवून ठेवल्या होत्या, असा आरोपही चोडणकर यांनी यावेळी केली. कॉंग्रेस पक्षाला मात्र, या छापील मतदार याद्या खूप उशिराने देण्यात आल्या. आणी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना अजूनही मतदार यादीच्या डिजिटल प्रती देण्यात आल्या नसल्याचे चोडणकर यानी स्पष्ट केले. आपल्या उमेदवारांना या यादींच्या डिजिटल प्रती लवकरात लवकर पुरवण्याची सोय करावी, अशी मागणी केली असल्याचे चोडणकर यानी सांगितले.

दरम्यान, राज्यातील बीएलओंनीही वोटर स्लिप्सचे वितरण केले नसल्याचे चोडणकर यांनी पत्रातून राज्य निवडणूक आयोगाला कळवले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये निवडणुकीविषयी जागृती झाली नसल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे. त्याशिवाय त्यामुळे मतदारांना आपले मतदार केंद्र कुठे आहे, तसेच मतदार यादीतील आपला क्रमांक काय आहे याची माहिती मिळू शकली नसल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे.