जानेवारीपासून नवीन मोटर वाहन कायदा ः वाहतूकमंत्री

0
145

राज्यात येत्या १ जानेवारी २०२१ पासून नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल दिली.
केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याची देशपातळीवर विविध राज्यांत अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तथापि, गोव्यात नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.

नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी आणखी लांबणीवर टाकता येणार नाही. राज्यातील रस्ते खराब असल्याने नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली होती. आत्ताही रस्त्याची स्थिती चांगली नाही. रस्ते दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केले जात आहे. नवीन मोटर वाहन कायद्यात नियम उल्लंघनासाठी दंडाची रक्कम जास्त आहे. राज्यातील टूरिस्ट टॅक्सींना येत्या १ जानेवारीपासून मीटर बसविण्यास सुरुवात केली जाणार आहे. कोविड महामारीमुळे टॅक्सींना मीटर बसविण्याचे काम लांबणीवर पडले आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

जिल्हा पंचाययत निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यवाही केली जात आहे. असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.