जानेवारीत उत्तर गोव्यात 13 लाखांचे ड्रग्स जप्त

0
3

उत्तर गोव्यातील पोलीस स्थानकांनी जानेवारी 2025 या महिन्यात अमलीपदार्थप्रकरणी 10 गुन्हे दाखल करून 13.69 लाखांचे अमलीपदार्थ हस्तगत केले असून, 10 जणांना अटक केली, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी काल दिली.
उत्तर गोवा पोलिसांनी जानेवारी महिन्यामध्ये अमलीपदार्थविरोधी मोहिमेंतर्गत 10 गुन्हे नोंदवले असून, या प्रकरणांमध्ये 1 विदेशी, 5 परराज्यातील व 4 स्थानिक अशा 10 जणांना अटक केली, असेही अक्षत कौशल यांनी सांगितले.
दरम्यान, कळंगुट व म्हापसा पोलिसांनी अमलीपदार्थ प्रकरणांमध्ये काल तिघांना अटक केली. शनिवारी पहाटेच्या सुमारास म्हापसा पोलिसांनी माडानी-पर्रा येथे संशयित आरोपी सुखा मसाका माझी (29, ओरिसा) व चंदन चैतन्य सेठी (23 रा. कळंगुट व मूळ ओरिसा) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. याशिवाय कळंगुट पोलिसांनी नायकावाडा येथे छापा टाकून अखिल अनिल म्हाळसेकर (24, रा. सांगोल्डा) याला अटक करून अडीच लाखांचा एमडीएमए जप्त केला.