जाणार म्हणजे जाणार !

0
55

कर्नाटक आमदार विदेशवारीवर ठाम

राज्याचे अनेक भाग भयानक दुष्काळस्थितीत असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व आमदारांचे शिष्टमंडळ लॅटिन अमेरिका दौर्‍यावर जाण्याबाबत ठाम आहे. दौरा ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे काल विधिमंडळ समितीने जाहीर केले. 

जानेवारीत १८ आमदार विदेशवारीवर जाणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा विषय मोठा नसल्याचे सांगितले. हा काही पहिलाच विदेश दौरा नव्हे, असे ते म्हणाले. विधिमंडळाच्या समितीचे अध्यक्ष मल्लिकय्या गुतेदर म्हणाले की, विदेशवारी म्हणजे गुन्हा नव्हे. शिवाय यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार नसून प्रत्येक आमदारावर साधारण ७ लाखांच्या आसपास खर्च होईल.
१२ दिवसांच्या या ‘अभ्यास दौर्‍यात’ आमदार ब्राझिल, अर्जंटिना, पेरू तसेच दुबईला भेट देतील. ब्राझिलमध्ये रियोच्या जंगलांत त्यांची भटकंती असेल तसेच मानोस येथे ते शॉपिंग करतील. शिवाय याठिकाणी एका स्थानिक हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण व संगीताचा कार्यक्रम होईल.
दरम्यान, राज्य सध्या दुष्काळस्थितीत सापडले असून राज्य सरकारने केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. 
गेल्यावर्षी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे काही आमदारांबरोबर विदेशवारीवर गेले होते. मात्र नंतर विरोधानंतर त्यांना दौरा अर्ध्यावर गुंडाळून परतावे लागले होते.