आता लहान मुलांनाही कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानसार केंद्र सरकारने अहमदाबाद येथील कंपनी जाइडस कॅडिलाने विकसित केलेल्या ‘जाइकोव्ह-डी’ या लशीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय कोरोना विषाणू विरोधी लसीकरण मोहिमेत लशीचा समावेश या महिन्यातच करण्यात येणार आहे. या लशीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. भारतातील औषध नियामक प्राधिकरणाने १२ वर्ष व त्यावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी ‘जाइकोव्ह-डी’ लशीला मंजुरी दिली आहे. वय वर्ष १२ व त्यावरील व्यक्तीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आलेली ही पहिलीच लस आहे. एका डोसची किंमत कराशिवाय ३५८ रुपये आहे.