मडगाव (न प्र.)
जांबावली येथे श्री रामनाथ दामोदर संस्थान समितीने मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध केलेली असून सदर केंद्राचे उद्घाटन दसर्याच्या दिवशी रिवणचे सरपंच सुर्यकांत नाईक यांच्या हस्ते झाले. रविवार वगळता रोज दुपारी १.३० ते ३.३० पर्यंत मडगावचे डॉक्टर व्यंकटेश हेगडे सदर केंद्रात रुग्णांवर उपचार करतील. तर परिचारीका निशा लोलयेकर त्यांना मदत करतील. केंद्राच्या उद्घाटनावेळी संस्थानचे अध्यक्ष प्रकाश कुंदे, दत्ता हेगडे, उमेश बांबोलकर, रमेश शेणवी, संदेश हेगडे देसाई, गोपाळ काकुले, अच्युत हेगडे देसाई, विनोद जांबावलीकर, सुनील जांबावलीकर, भावेश जांबावलीकर, एकनाथ जांबावलीकर, नागेश भेंब्रे, मकरंद जांबावलीकर, दामोदर जांबावलीकर, आनंद जांबावलीकर, सुरज जांबावलीकर, तुषार जांबावलीकर व इतर उपस्थित होते. सरपंच नाईक संस्थानचे अध्यक्ष कुंदे व उर्वरित समितीच्या गौरव करताना म्हणाले, अशी आरोग्यसुविधा कोणत्याही देवस्थानात दिलेली आपण पाहिलेली नाही.