गेल्या अनेक वर्षांपासून मोस्ट वॉंटेड असलेला दहशतवादी अबू झरार याचा काल जम्मू-काश्मीरमधील पूंछ-राजौरी जिल्ह्यामध्ये खात्मा करण्यात आला. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये अबू झरारला कंठस्नान घालण्यात आले. अबू झरारला भारतामध्ये मोठ्या दहशतवादी कारवाया करण्यासोबतच सुरक्षा दलावर मोठे हल्ले करण्याची जबाबदारी सोपवून भारतात पाठवण्यात आले होते.
चार महिन्यांपूर्वी ऑगस्ट महिन्यात अबू झरार पहिल्यांदा पूंछ जिल्ह्यात दिसला होता. तेव्हापासून लष्कर आणि पोलीस त्याच्या मागावर होते. अबू झरारचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जाते. नियंत्रण रेषेजवळ पूंछ-राजौरी भागात खात्मा करण्यात आलेला अबू झरार हा आठवा दहशतवादी आहे.