राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी जसपाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला हे गुरुवार ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या रिक्त होणार्या पदावर जसपाल सिंग यांची नियुक्ती झाली आहे. नवे पोलीस महासंचालक जसपाल सिंग हे १ एप्रिल रोजी पदभार स्वीकारणार आहेत. आयपीएस अधिकारी जसपाल सिंग यांनी गोव्याचे पोलीस महानिरीक्षक म्हणून देखील काम केले आहे.