राज्य सरकारने एका आदेशाद्वारे जलस्त्रोत खात्याच्या संचालकपदी (प्रशासन) परेश फळदेसाई यांची काल नियुक्ती केली असून, त्यांच्याकडे खास अधिकारी म्हणून म्हादई जलतंट्याच्या कामाचा ताबा सुपूर्द केला आहे. फळदेसाई यांना कामकाजाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.