बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सरकार बंदर कार्यात सुधारणा घडवून आणत असून चांगल्या पध्दतीने जलमार्गांचा विकास करण्यास प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे रस्त्यांवरील भार कमी होईल अशी माहिती मायकल लोबो यांनी म्हापसा येथील प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय तिरंगा फडकविल्यानंतर दिली.
गोव्याला कचरामुक्त राज्य बनविण्यासाठी सरकारच्या प्रयत्नाबद्द्ल बोलताना लोबो यांनी गोव्याला २०२२ पर्यंत कचरामुक्त राज्य बनविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. ज्यामुळे पर्यटक आकर्षित होतील असे ते म्हणाले. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे सरकार कचर्याची आधुनिक पध्दतीने प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.
मेरशी येथे गोवा बाजार इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून त्यामुळे स्वंय मदत गटांना सशक्त होण्यास मदत होईल आणि शेवटी महिलांचे सशक्तीकरण होईल असे त्यांनी सांगितले.