जर्मन नागरिकाकडून 24 लाखांचे ड्रग्ज जप्त

0
2

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने वागातोर येथे छापा घालून सेबस्तियन नामक एका जर्मन नागरिकाला अटक करत त्याच्याकडून सुमारे 23 लाख 95 हजार रुपयांचा अमलीपदार्थ हस्तगत केला, अशी माहिती अमलीपदार्थ विरोधी विभागाचे पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी पोलीस मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिली. संशयित जर्मन नागरिकाकडे एमडीएमए, गांजा, चरस असा विविध प्रकारचा अमलीपदार्थ आढळून आलो. अमलीपदार्थविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी कळंगुट परिसरात पश्चिम बंगालमधील एकाला अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वागातोर येथे जर्मन नागरिकाला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणामध्ये सखोल चौकशी सुरू असून, आणखी काही जणांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती वर्मा यांनी दिली.