जयेशचा मृतदेह स्वीकारण्यास नकार

0
3

चिंबल जंक्शनवरील वाहन पार्किंगच्या वादानंतर संशयास्पद मृत्यू झालेल्या जयेश चोडणकर (42) यांचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला असून, या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी त्यांनी काल केली. गेल्या बुधवारी रात्री ही घटना घडली होती. जयेश चोडणकर यांच्या कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. जोपर्यंत खुनाचा गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत जयेशचा मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. जुने गोवे पोलिसांनी या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच मारहाण प्रकरणी कृपेश वळवईकर आणि आयआरबी पोलीस प्रीतेश हडकोणकर या दोघांना अटक केली आहे.