जयललितांना अखेर जामीन मंजूर

0
85

परदेशी बँकांमध्ये काळा पैसा असलेल्या भारतीयांची नावे उघड करता येणार नाहीत, असे केंद्र सरकारने काल सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले असून मोदी सरकारचे हे घुमजाव असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. कॉंग्रेस पक्षाने याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी असे म्हटले आहे.भारताने अनेक देशांसोबत दुहेरी करप्रणालीसंदर्भात करार केले आहेत. त्या करारानुसार संबंधित देशांनी दिलेली काळ्यघ पैशांची माहिती उघड केल्यास, त्या करारांचा भंग होऊ शकतो. त्यामुळे ती माहिती उघड करता येणार नाही, असे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टापुढे सांगितले.
विशेष म्हणजे केंद्रात युपीए सरकार सत्तेत असताना हीच भूमिका घेण्यात आली होती. त्यावेळी विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने युपीएवर काळा पैसा बाळगणार्‍या धेंडांना सरकार पाठिशी घालत असल्याचा गंभीर आरोप केला होता. आता सत्तेवर आल्यानंतर भाजपा यू-टर्न घेत असल्याचा आरोप करीत कॉंग्रेस पक्षाने पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
युपीए सरकार काळात काळ्या पैशांच्या प्रश्‍नावरून उठविलेल्या भूमिकेची आठवण करून देत कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मानू सिंघवी म्हणाले की, भाजपाकडे राजकीय प्रामाणिकतेची काही गोष्ट असल्यास पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी. सरकारच्या भूमिकेविषयी आश्‍चर्य व्यक्त करत भ्रष्टाचारविरोधी आंदोलन केलेल्या अण्णा हजारे, बाबा रामदेव व किरण बेदी यांनी आता पुन्हा भाजपविरोधी आंदोलन छेडावे असे म्हटले आहे. जयललिता यांची प्रकृती ठीक नसल्याचे विचारात घेत कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला असून त्यांना घरात उपचार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना १८ डिसेंबरपर्यंत घराबाहेर जाता येणार नाही. कर्नाटक हायकोर्टाने दिलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. अद्याप ही शिक्षा रद्द करण्यात आलेली नाही. दरम्यान, जयललितांना जामीन मंजूर झाल्याने तामिळनाडूत जल्लोषाचे वातावरण आहे.