तामिळनाडूतील स्थिती पूर्वपदावर
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगात पाठविण्यात आलेल्या अभाअद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांना जामीन मिळविण्यासाठी त्यांचे वकील आज कर्नाटक न्यायालयात याचिका सादर करणार आहेत. दरम्यान, शनिवारच्या हिंसाचारानंतर तामिळनाडूमधील स्थिती पूर्वपदावर आली आहे. तसेच बंगळूर येथील विशेष न्यायालयाने जयललिता यांच्या विरोधात दिलेल्या निवाडयाला स्थगिती मिळविण्यासाठीही त्यांचे वकील चर्चा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. वरिष्ठ वकील बी. कुमार यांनी याप्रकरणी आपण आज कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका सादर करणार असल्याचे स्पष्ट केले. वरील न्यायालयाने जयललिता यांना ४ वर्षे तुरुंगवास व १०० कोटी रु.चा दंड ठोठावला आहे. या निवाड्यामुळे त्या ताबडतोब आमदार म्हणूनही अपात्र ठरल्या आहेत. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी होऊ शकते.