दिल्ली – जयपूर महामार्गावर काल रात्री एका गॅस टँकरला आग लागून झालेल्या स्फोटात १० जण जिवंत जळाले, तर इतर बारा जण जखमी झाले. बीलपूर गावाजवळ ही भीषण दुर्घटना घडली. ज्वालाग्राही वायू घेऊन चाललेल्या या टँकरला मोटारसायकली वाहून नेणार्या एका ट्रकची मागून धडक बसल्याने ही वायूगळती होऊन ही भीषण आग लागली. रस्त्याने जाणार्या इतर सात वाहनांवर या टँकरचे जळते अवशेष पडले. मात्र, या दुर्घटनेवेळी गॅसवाहू टँकरचा चालक मात्र स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरला. यावेळी झालेल्या स्फोटाची झळ जवळच्या एका मंदिराला व दुकानालाही लागली.