पाकिस्तान रेंजर्सनी काल जम्मूमधील कठुआ जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या चार गावांवर हल्ले चढवित पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग केला. भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी रेंजर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान रेंजर्सनी सीमेलगत उखळी तोफांचा मारा केला. तसेच बर्याचदा गोळ्यांच्या फैरीही झाडल्या. रविवारी रात्रीच्या या हल्ल्यांना सीमा सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले अशी माहिती दलाच्या अधिकार्यांनी दिली. या हल्ल्यांमध्ये आपल्या बाजूने कोणीही जखमी झाले नसल्याचे या अधिकार्याने सांगितले.