जम्मू-काश्मीर, दिल्लीत जाणवले भूकंपाचे धक्के

0
4

जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात मंगळवारी दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या या धक्कक्यांची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल इतकी होती. जम्मू काश्मीरमधील डोडा, जम्मू, उधमपूर, पुंछ आणि श्रीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. या भूकंपाचे केंद्र हे डोडा जिल्ह्यामध्ये होते. जम्मू आणि काश्मीरसह राजधानी दिल्लीतही भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. दिल्लीतही 5.4 रिश्टर स्केलने हे भूकंपाचे झटके जाणवले आहेत. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये देखील भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. या भूकंपामुळे शाळेतील विद्यार्थी, दुकानदार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया काश्मीरमधील नागरिकांनी दिली.