केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये येत्या 30 सप्टेंबरपूर्वी विधानसभा निवडणूक होईल. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा दिला जाईल असे म्हटले आहे. शनिवारी रात्री उशिरा एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री बोलत होते. शहा यांनी छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांची समस्या आणि समान नागरी संहितेविषयी बोलताना, येत्या 5 वर्षात देशात यूसीसी लागू करण्यात येणार आहे. देशात सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील असे सांगितले.