जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी

0
2

न्हयबाग-पोरस्कडे येथील तरुणाचा सातारा येथे शनिवारी रात्री उशिरा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. भगवान उत्तम कासकर असे मृत तरुणाचे नाव आहे. भगवान याचा रविवारी वाढदिवस होता. देवदर्शनासाठी जात असतानाच आणि वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला काळाने त्याला हिरावून घेतल्याने कासकर कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.

सविस्तर माहितीनुसार, भगवान उत्तम कासकर याचा 20 एप्रिलला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घ्यावे आणि त्या ठिकाणी पूर्ण कुटुंबीयांना आशीर्वाद घ्यावा, यासाठी तो आपल्या तीन मित्रांसोबत कारमधून शनिवारी शिर्डीच्या प्रवासाला निघाले होते. शनिवारी रात्री 11 :30 वाजता सातारा येथे रस्त्याच्या बाजूच्या एका हॉटेलमध्ये जेवण केले .आणि त्याच ठिकाणी वाढदिवसाचा केक कापण्यात आला. आणि ज्या हॉटेलच्या परिसरात रस्त्याच्या बाजूला वाहन पार्क केले होते. त्या वाहनाकडे जात असतानाच भरधाव वेगाने निघालेला एक कंटेनर वीज खांबाला धडकला आणि उलटला. तो उलटत असल्याचे पाहून भगवान कासकर आणि त्याच्या मित्रांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी अन्य तिघेजण बचावले; मात्र भगवान हा पळत असतानाच त्याच्यावर कंटेनर उलटला आणि त्याखाली तो चिरडला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सातारा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

पोरस्कडे न्हयबाग भागात ही वार्ता कळताच कासकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. भगवान हा रेती व्यवसायात छोटी-मोठी काम करत असे. चार बहिणी आणि हा एक छोटा भाऊ कुटुंबीयांचा आधार होता; परंतु त्याच्यावरच काळाने घाला घातल्यामुळे कुटुंबीयांवर संकट ओढवले आहे. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रविवारी साताऱ्याकडे निघाले होते.