जम्मू-काश्मीरच्या राजौरीजवळ भारतीय सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या परिसरात रात्री उशिरापर्यंत चकमक चालू होती. दरम्यान सांबा जिल्ह्यात सीमेजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असून त्यात २ पिस्तुल, ५ मॅगझिन, १२२ राऊंड गोळ्या आढळल्या. ही शस्त्रे पाकिस्तानी द्रोनमधून भारतात आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तसेच श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी दोन मोठे स्फोट घडवून आणले. मात्र यात काहीही नुकसान झाले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे हे स्फोट करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.