जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच दहशतवादी ताब्यात, एक ठार

0
28

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा पोलिसांनी, दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अनेक ग्रेनेड हल्ल्यांशी संबंधित प्रकरणांचा तपास करत असताना दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या सक्रिय सहकार्यांचे नेटवर्क उघड करत पाच दहशतवाद्यांना अटक केली.

शौकत इस्लाम दार, एजाज अहमद लोन, एजाज गुलजार लोन, मंजूर अहमद भट आणि नसीर अहमद शाह अशी त्यांची नावे आहेत. प्राथमिक तपासात हे पाचहीजण मॉड्यूल स्लीपर सेल म्हणून काम करत होते आणि शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खरेदी तसेच वाहतुकीमध्ये गुंतले होते. त्यांच्या पाकिस्तानी आकाच्या सांगण्यावरुन सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक ग्रेनेड हल्ल्यांमध्येही त्यांचा सहभाग होता. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी काकापोरा पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुलगाममध्ये हिजबुल कमांडर ठार
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा नवनियुक्त जिल्हा कमांडर शनिवारी ठार झाला. दक्षिण काश्मीरच्या अश्मुजी भागात दहशतवादी असल्याच्या गुप्त माहितीवरून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. तेव्हा दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तरात हिजबुल मुजाहिद्दीनचा नवनियुक्त जिल्हा कमांडर मुदासीर वाजे चकमकीत मारला गेला.

शोधमोहिमेदरम्यान, दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची भरपूर संधी देण्यात आली मात्र तकडे दुर्लक्ष करत दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दहशतवाद्यांवर प्रत्त्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा नवनियुक्त जिल्हा कमांडर मुदासीर वागे या चकमकीत मारला गेला.